Tag Archives: spontaneous

श्रावणा रे…

6 Jan

Re Vasanta

श्रावणा रे तू तरी, मजला जरा बिलगून जा.

कोरड्या माझ्या किनाऱ्या, तू जरा भिजवून जा.

.

रिक्त ह्या माझ्या नद्या, ओशाळती तुझिया मुळे.

सागरा आलिंगण्यासी, प्राण त्यांचा तळमळे.

याचना त्यांच्या मनीची, तू जरा ऐकून जा.

श्रावणा रे तू तरी, मजला जरा बिलगून जा…

.

रुक्ष ह्या माझ्या दऱ्या, नवजीवना आसावती.

पक्षी ही आभाळ लांघून, उंच जाऊ पाहती.

पर्वतांच्या श्रुंखलांना, खूळ तू लावून जा.

श्रावणा रे तू तरी, मजला जरा बिलगून जा…

.

आसवांच्या गलबतांचे, नाट्य तू वर पाहशी.

स्वप्नवेड्या ह्या जीवाचे, मर्म ही तू जाणशी.

कोसळूनी तू तरी, स्वप्न ते विझवून जा.

श्रावणा रे तू तरी, मजला जरा बिलगून जा…

Advertisements
%d bloggers like this: